Showing posts with label Come on National Hero's marathi poem. Show all posts
Showing posts with label Come on National Hero's marathi poem. Show all posts

Sunday, June 13, 2010

Hence M not Fall in Love, Marathi Poem

म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं, Hence M not Fall in Love


पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

the writer said every time
I am engaged with study, friendship,
and many things. Hence M not Fall in Love.

Saturday, June 12, 2010

हल्लीच break-off झालाय माझा Marathi Poem

Break Off The Marathi Poem


हल्लीच break-off झालाय माझा


खुप वर्ष झाली आहेत भारताला मिळून
स्वातंत्र्य
मीही झालो आहे हल्लीच स्वतंत्र


नाही ती वाईट
होती,नाही माझा तसा हेतु होता
पण परिस्थितीमुळे आमचा break-off झाला
होता


सकाळी कॉलेजला जाताना दिसतात काही couples
तेव्हा मलाही
आठवतात ते आमचे सोनेरी दिवस


train ने,bus ने प्रवास करताना
वाटत बाजूची seat रिकामीच राहावी
जणू काही तीच बाजूला येवून बसेल ही आस
असावी


आजही तिची आठवण आली की जातो मी त्या ठिकाणी जिकडे आम्ही
भेटायचो
एकत्र पाहिलेली स्वप्ने आज पुन्हा पण एकट्यानेच पाहतो


तसा
मी जातो "आमच्या " जुन्या ठिकाणी खुप वेळा
तुम्हाला म्हणून सांगतो तिला
ही पाहिलय तिकडे मी ३-४ वेळा


तिच्या असण्याने आयुष्याला आलेली
पूर्णता झाली आहे नष्ट
अंधश्रध्ळूला नसणारा मी मलाही वाटायला लागल आहे
की मलाही लागली आहे कोणाची तरी दृष्ट


आधी म्हणल्याप्रमाणे मी
खरच झालो आहे का स्वतंत्र?
माझी अवस्था तर भारतासारखी झाली आहे
स्वातंत्र्य मिळूनही पारतंत्र्य असल्यासारखी आहे.

the writer said "just before a time I am Break Off & I am feel like a freedom, But at the end writer confused realy I am Free or .............."

Saturday, May 22, 2010

Come on National Hero's उठा राष्ट्रवीर हो

Come on National Hero's Marathi Poem

उठा राष्ट्रवीर हो
सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला

युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळून सवर् शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा राष्ट्रवीर हो ...

वायूपुत्र होऊनी धरु मुठीत भास्करा
होऊनी अगस्ती ही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊया, समर्थ होऊ या चला
उठा राष्ट्रवीर हो ...

चंद्रगुप्त वीर तो फिरुन आज आठवू
शुरता शिवाजीची नसानसात साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा राष्ट्रवीर हो ...

यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी, तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य, दाखवू जगा चला
उठा राष्ट्रवीर हो
Come on National Hero's is marathi poem where the writer appeals to his soldier, Said come on Soldirs keep moving on with your arms, today war is begun, with all we will dfeat our enemy. come on national hero's.