Thursday, May 13, 2010

चांदीच्या ताटात ठेवले होते गहू The Marathi Wedding Quote Ukhane

Marathi Ukhane


चांदीच्या ताटात ठेवले होते गहू
लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ

एक होती चिऊ एक होती काऊ
गणपत रावांच नाव घेते , डोक नका खाऊ

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ

चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे
घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे

बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या
गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या

वाकडी तिकडी बाभूळ, तिच्यावर बसला होला
सखा पाटील मेला , म्हणून तुका पाटील केला

लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास

आजघर माजघर माजघराला नाही दार
गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार

कर्दळीच्या वनात चंडोल पक्षी लपला
XXX शी लग्न करून YYY जन्माचा धुपला

कंप्युटरला असते फ़्लॉपी डिस्क
हिच्याशी लग्न करून मी घेतलिय मोठी रिस्क

रेशमी सदर्‍याला प्लास्टीकचे बक्कल
गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल

समुद्रच्या काठावर मऊ मऊ वाळू
गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू

keep in visiting for more marathi content.