The Middle Class Life - आम्ही मध्यम वर्गीय - Marathi Poem
आम्ही मध्यम वर्गीय ......महिन्याच्या शेवटच्या दिवसाला आम्ही भूताइतकेच घाबरतो,
घासून झिजलेला कपड्यांचा साबण आम्ही हात धुण्यासाठी वापरतो..
बायकोला मॉल मध्ये फिरवताना आमच काळीज जोरात धडधडत,
ऑफिस मधल्या बॉस विरुद्ध आमच मन फक्त झोपेतच बडबडत...
नविन construction दिसल की आमचे पाय आपोआप थाम्ब्तात..
पण हाऊसिंग लोनचे दर ऐकले की आमचे 1BHK चे प्लान लाम्बतात..
आम्हाला ही वाटत कधी शाहरुख सारख गावं,
"हिला" काजोल समजून मीठी मध्ये घ्यावं,
बागड़तो तेव्हा Switzerland च्या थंडित थुई थुई मोर होउन..
भंगते मात्र तंद्री आमची, जेव्हा येते बायको उघड पोर घेउन..
१ ते ३० तारखे मध्ये आमचा जीव मेटाकुटिला येतो,
अन्थरूण नेहमीच छोट पडत तरी पसारा सावरून घेतो..
नसतो आम्ही मूळचे शूर, तरी नसतो आम्ही भाकड,
संसाराच्या सर्कशीत नाचताना, आमच होत माकड..
नसेल आमची झेप कदाचित "प्रतिष्ठितां" पर्यंत पोचण्याची..
पण आहे का "प्रतिष्ठितां" मध्ये जिगर "मध्यम वर्गीय" म्हणून जगण्याची?