Happy Makar Sankranti to you all and your family.
Makar Sankranti Marathi Poem Til gul ghya god god bola
तिळगूळ घ्या, गोडगोड बोला,प्रेमाची उधळण, नको अबोला.
मकरसंक्रांतीच्या दारी, नांदे उत्सव मांदियाळी,
हळदी-कुंकू सजे भाळी, जसा पतंग आभाळी.
तीळ होते मूठभर, गूळ घातला थोडा,
आनंदी प्रहरी, तीळतीळ अहंकार सोडा.
माझा पतंग स्वच्छंद, झाला वाऱ्यावर स्वार,
कुणी बांधू नका दोरा, होईल त्याला भार.
गोड गोड तिळगूळ, जिभेवर ठेवा थोडे,
पाझरू दया गोडवा, आनंदाला उधाण भोळे