Saturday, July 24, 2010

Sachin My Dear Friend Music: वाटेतल्या अनंत अडचणींना तोंड मी देत गेले

Sachin My Dear Friend Music: वाटेतल्या अनंत अडचणींना तोंड मी देत गेले

I will Meet You Soon - मी पुन्हा भेटेन

I will Meet You Soon - मी पुन्हा भेटेन - Marathi Poem


मी पुन्हा भेटेन ....
त्याच जुन्या वळणावर
नव्या वाटा शोधताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच बेधुंद वाऱ्यासोबत
काळाशी स्पर्धा करताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच बेफान लाटांसोबत
आकाशाला गवसणी घालताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच हसणाऱ्या फुलांसोबत
आनंदाचे साम्राज्य पसरवताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच तळपणाऱ्या सूर्यासोबत
नव्याने तेजस्वी होताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच हळव्या आठवणींमधून
नकळत पावसासोबत बरसताना.

I will Meet You Soon - मी पुन्हा भेटेन a Marathi poem writer says, I will meet you soon on those old turning, when i search for new ways in life I will meet you.