Tuesday, April 14, 2009

College Marathi Poem For You - आजही मला ते सर्व आठवतयं


College Marathi Poem For You - आजही मला ते सर्व आठवतयं


आजही मला ते सर्व आठवतयं

जणू कालचं सारे घडल्यासारखं

तीच आयुष्याची मजा घेत

मित्रांच्या सहवासात बसल्यासारखंअजुनही मला आठवतंय....

Lecture ला दांडी मारुन

बाजुचा परिसर फिरत बसायचो

फिरुन कंटाळा आला की

परत college कडे वळायचोCanteen वाल्याला शिव्या घालत

बाहेरच्या café मध्ये जायचो

Café बंद असला की परत

Canteen मधलंच येऊन गिळायचोLibrary card चा तसा कधी

उपयोग झालाच नाही

Canteen समोरच असल्याने

Library कडे पावलं कधी वळलीच नाहीतआमच्या group ला मात्र

मुलींची तशी allergy होती

कदाचीत college कडून ती

आमच्या group ला झाली होतीचालु तासाला मागच्या बाकावर

Assignment copy करायचो

ज्याची copy केली आहे त्याच्या

आधीच जाउन submit करायचोखुप आठवतात ते दिवस ...

सोबत रडलेलो क्षण आठवले की

आज अगदी हसायला येते

पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की

डोळ्यात टचकन् पाणि येतं .............

Love you my dear friends, Without you life is not possible. With some responsibilities towards the life we are not together but I remember every day when we all are with together. Those days are very precious,  and sure we will be together in whole life by soul.

No comments: