शोधायचं असतं ……..
शोधायचं असतं ……..
मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं .............
पण जीवनभर विश्वासने साथ देणारा हात आपणच आपलं शोधायचा असतो......
सावलीसाठी कोणी स्वताहून आसरा देत नसतं …….
रणरणत्या उन्हात सावलीसाठी एक झाड आपणच आपलं शोधायचं असतं …..
नावेला किनाऱ्यावर आणण्यासाठी कोणी पुढे येत नसतं ..........
वादळात नावेला वाचवण्यासाठी आपणच आपलं नावाडी व्हायचं असतं ...............
पाण्याच्या थेंबाना मोल सहज येत नसतं.........
निसटत्या पानावर थांबून दवबिंदूनी आपणच आपला अनमोल ठरायचं असतं.......
पांढऱ्या रंगाला सौंदर्य असंच प्राप्त होत नसतं ...........
त्यासाठी त्याने पाण्याआड जाऊन इंद्रधनू म्हणून उमटायचा असतं.......
आयुष्य दिलं आहे म्हणून जगायचं नसतं........
आपल्यातलाच आपलं शोधून आयुष्याला घडवायचा असतं.....................
The writer says Search your life, what ever you start?
Dont be shy in friendship, keep your hand with friends,
live your life with joy.
More Poems and Marathi Content Visit here
No comments:
Post a Comment