Saturday, July 9, 2011

एक गाणं पावसामध्ये सूर हरवून भिजलं Marathi Spring Poem

एक गाणं...

पावसामध्ये

सूर हरवून भिजलं...

बेसुऱ्या बेडकाच्या...

घशात जाऊन थिजलं...!

एक पाऊस...

रस्त्यावरती...

थेंब हरवून बसला...

अळवाच्या पानावर....

क्षणभरच दिसला....!

एक तो...

तिच्या हसण्यावर...

खुळ्यागत फसला...

ताळ्यावर येण्यासाठी ...

पावसात भिजत बसला...!


No comments: