Thursday, June 24, 2010

Love has been alive Marathi poem - प्रेम देता आल पाह्यजे

Love has been alive Marathi poem - प्रेम देता आल पाह्यजे


प्रेम देता आल पाह्यजे, प्रेम घेता आल पाह्यजे प्रेम
प्रेम देता आल पाह्यजे, प्रेम घेता आल पाह्यजे
प्रेम देता आल पाह्यजे,
प्रेम घेता आल पाह्यजे
आयुष्यावर भरभरून
प्रेम करता आल पाह्यजे
प्रेम काय असत,
हे विचारा,प्रेम काय नसत!
आईच हलूवार गोंजारण
म्हणजे प्रेम असत
वडीलांच कधीतरी रागावण
म्हणजे प्रेम असत
भावाने केलेली धमाल
म्हणजे प्रेम असत
बहिणीने दिलेला रुमाल
म्हणजे प्रेम असत
मित्राने पाजलेली बीअर
म्हणजे प्रेम असत
'ती' लाजून म्हणते, 'डिअर ',
ते तर प्रेमच असत

प्रेम झेलता आल पाह्यजे
प्रेम पेलता आल पाह्यजे
प्रेम करण्यासाठी आधी
फुलता आल पाह्यजे
प्रेम कस असत,
हे विचारा,प्रेम कस नसत!
प्रेम मंगल असत,
प्रेम पवित्र असत
प्रेम म्हणजे अशावेळी
श्रीरामाच चरित्र असत
प्रेम खट्याळ असत,
प्रेम व्याकुळ असत
प्रेम म्हणजे कृष्णासाठी
गजबजलेल गोकुळ असत
प्रेम फालतू नसत
प्रेम बेगडी नसत
प्रेम म्हणजे देण-घेण तोलणारी
तागडी नसत
प्रेम नाटकी नसत,
प्रेम दिखाऊ नसत
जे दिखाऊ असत
ते प्रेम टिकाऊ नसत

प्रेम भजता आल पाह्यजे,
प्रेम पूजता आल पाह्यजे
प्रेमासाठी प्रेमामध्ये
भिजता आल पाह्यजे

No comments: